'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर : अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्यांवर महसूल व पोलीस विभागाची कडक कारवाई | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Warora,Chandrapur Live,Chandrapur  News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

वरोरा : 
वरोरा तालुक्यातील बामर्डा रेती घाटातून पोकलेन मशीन द्वारे रेतीचा अवैधरित्या उपसा करीत असल्याची माहिती मिळाली यावरून महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करीत ०१ करोड ६३ लाख रुपये किमतीचे पोकलेन मशीन हायवा ट्रक व बेलोरा पिकप वाहन जप्त करीत वरोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बामर्डा रेती घाटाचा लिलाव झाला या लीलावातील आदेशामध्ये असलेले अटी शर्तीचे उल्लंघन करीत नदीपात्रात माती व गोटे टाकून पाण्याचा प्रवाह बदलून पोकलेन मशीन द्वारे रेतीचा उपसा करीत हायवा ट्रक मध्ये रेती भरून वाहतूक करणार असल्याची माहिती महसूल पोलीस विभागास मिळाली या संयुक्त पथकाने सदर ठिकाणी धाड घालीत दोन पोकलेन मशीन नऊ हायवा ट्रक बेलोरा पिकअप वाहन जप्त करीत घाटमालक मोहम्मद इम्रान सिद्ध की मन्नू सिद्ध की व त्यांचा सुपरवायझर वाहन मालक चालक यांच्याविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशन मध्ये कलम ३७९, ४३०, ४३१, १०९, १८८, ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

सदर कारवाई उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, तहसीलदार सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चावरे, मनोर आमने, गुरु शिंदे मंडळ अधिकारी बराजपुरे आदींनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×