चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विभागप्रमुख तथा विद्यार्थ्यांना याद्वारे सुचित करण्यात येते कि, विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2022-23 मधील उन्हाळी- 2023 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा ( व्यावसायीक अभ्यासक्रमातील सेमी. 2 वगळून) दिनांक 08 मे 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.
सदर परीक्षा विद्यापीठाच्या प्रचलित नियमाप्रमाणे घेण्यात येईल. याबाबत सर्व सन्मा. प्राचार्यांनी आपल्या स्तरावरून सर्व अभ्यासक्रम विहीत कालावधीत पुर्ण करण्याचे संबंधीत विषय शिक्षकांना अवगत करून द्यावे.