Chandrapur & Gadchiroli Earthquake: गडचिरोली, चंद्रपुरात भुकंपाचे झटके | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Earthquake,Gadchiroli Earthquake,Gadchiroli,Gadchiroli News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Earthquake Today News,Ch

Chandrapur,Chandrapur Earthquake,Gadchiroli Earthquake,Gadchiroli,Gadchiroli News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Earthquake Today News,Chandrapur Earthquake News,Chandrapur   News

चंद्रपूर (Chandrapur) : तेलंगणा राज्यातील काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती उघडकीस आली आहे. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ कि.मी. आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

गोदावरी फॉल्ट परिसर भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार २१ मार्च रोजी सकाळी ८:४२ वाजता तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले.

त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिले आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गोडा यांना विचारणा केले, असता जिल्हा प्रशासनाकडे अजून तशी माहिती नाही. माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.