Breaking! बस आणि बुलोरोच्या धडकेत 2 मुली जागीच ठार तर 15 जखमी | Batmi Express

Yavatmal,Yavatmal News,Yavatmal Accident,Accident,Accident News,Accident News Live,Bus Accident,

Yavatmal,Yavatmal News,Yavatmal Accident,Accident,Accident News,Accident News Live,Bus Accident,

यवतमाळ
: दारव्हा ते यवतमाळ दरम्यान बोरी अरब, कामठवाडा गावासमोर यवतमाळ कडे जाणाऱ्या बस आणि बुलोरो वाहनाच्या अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून 8 वर्षीय पायल गणेश कीरसान आणि 11 वर्षीय पल्लवी विनोद भरडीकर असे मृत्यू झालेल्या मुलींचे नावे आहेत. तर सुनंदा मांजरे ही गंभीररित्या जखमी आहे. तर 12 ते 15 प्रवासी जखमी झाले. जखमींना यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून अनेकांची परिस्तिथी गंभीर असल्याचे समजते. 

मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा ते नागपूर जाणाऱ्या बस MH 40, 5022 या क्रमांकाची बस यवतमाळ कडे जात असताना कामठवाडा या गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव बुलोरो गाडीने चालकाच्या बाजूने धडक दिली. अपघात एवढा भीषण होत की बुलेरो वाहनातील पाईपने बसमधील खिडक्या संपूर्णपणे आ मध्ये गेल्या. यावेळी बस मध्ये बसलेल्या प्रवाशांना बोलेरो वाहनातील पाईपचा मार लागला. यामध्ये खिडकीच्या जवळ असलेले दोन मुलींचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.