- तालुका काँग्रेस कमिटीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
वडसा / देसाईगंज :- तालुक्यातील नागरिकांची उपजीविका धान पिकावर अवलंबून असून मागील वर्षाच्या नापिकीमुळे झालेली नुकसान भरपाई भरून काढण्याच्या प्रयत्नात येथील शेतकरी असतानाच करण्यात आलेल्या ८ तास वीज पुरवठ्यामुळे येथील शेतकरी अधिकच अडचणीत आले असून कृषी पंपाना 24 तास विज पुरवठा करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने देसाईगंज येथील तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देसाईगंज तालुक्यातील नागरिकांची उपजीविका धान पिकावर अवलंबून आहे. मागील वर्षापासून नापिकीमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली असुन यासाठी 24 तास सुरळीत विज पुरवठ्याची गरज असताना महावितरण कंपनीने आठ तास भारनियमन करून वीज पुरवठा करण्याचे सुचवले आहे. यामुळे तालुक्यातील धान पिक धोक्यात आले असुन कृषी पंपाना सुरळीत 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बूल्ले, पंकज चहांदे तालुकाध्यक्ष यु.कॉ. कमिटी, उपाध्यक्ष संजय करंकर, नरेंद्र गजपुरे मा. उपसरपंच पोटगाव, जगदीश शेंद्रे सचिव तालुका काँग्रेस कमिटी, मनोहर निमजे महासचिव तालुका काँग्रेस कमिटी, महेंद्र खरकाटे सचिव तालुका काँग्रेस कमिटी, जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज ढोरे, अरुण कुंभलवार तालुका ओबीसी विभाग अध्यक्ष, अतुल मेश्राम सहसचिव तालुका काँग्रेस कमिटी, सागर बनसोड, धनदेव सोनबावणे, गणेश ढवळे, स्वप्नील गुरणुले, अनंता वाडगुरे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.