कोरची प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंतीचे कार्यक्रम शिवसंग्राम मित्र मंडळ माळी समाज कोरची च्या वतीने साजरे करण्यात आले. त्यामध्ये ठिक 12:00 वा. ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी 2:00 ते 5:00 प्रबोधन मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी 6:00 ते 8:00 शिवरॅली व रात्रो 8:00 ते 10:00 शिवभोजन संपूर्ण जनसमुदायाकरिता देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश सोरते, उद्घाटक प्रा.मुरलीधर रुखमोडे, सहउद्घाटक तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष मनोजभाऊ अग्रवाल, प्रमुख पाहुणे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्ष नाशिरभाई भामानी, प्रमुख मार्गदर्शक गजभिये सर, शालीकराम कराडे सर तसेच प्रमुख पाहुणे आशिषभाऊ अग्रवाल, गुडुभाऊ अग्रवाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन कराडे, देवाजी मोहूर्ले, नगर सेवक धनराज मडावी, डॉ. स्वप्नील राऊत, प्रशांत मोहूर्ले, हंसराज मोहूर्ले, बेबीबाई मोहूर्ले, निराशाताई गावतुरे, सुशीलाबाई मोहूर्ले, कलाबाई शेंडे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सुरेश सोरते यांनी मार्गदर्शनपर शिवाजीराजे यांचे जीवन, समाजातील जातीप्रथा, व्यसनाधिनतां
यावर मार्गदर्शन केले. समाजातील जातीभेद दूर करून सर्वांनी एकत्रित येऊन सर्वच महापुरुषांच्या विचारांचे मंथन करावे आणि अशेच कार्यक्रम नेहमी आयोजित करावे असे कार्यक्रमाचे उदघाटक रुखमोडे सर यांनी मार्गदर्शनात आव्हान केले. कार्यक्रमचे संचालन राकेश मोहूर्ले, आभार संतोष मोहूर्ले यांनी मानले.
कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी शिवसंग्राम मित्र मंडळ यांचे अध्यक्ष प्रवीण गुरनुले, उपाध्यक्ष विक्की मोहूर्ले, सचिव अजित मोहूर्ले, प्रणय मोहूर्ले, सोहेल खान, चेतन मोहूर्ले, शौर्य वाढई, अंकुश, अरबाज, अस्लम, सपन खरवडे, मानसी वाढई, उत्कर्षा मोहूर्ले, अमोल जेंगठे, राज मोहूर्ले, गौरव गुरनुले,
सूत्रसंचालक व मार्गदर्शक राकेश मोहूर्ले, संतोष मोहूर्ले, श्रीहरी मोहूर्ले, तसेच संपूर्ण माळी समाजाने सहकार्य केले.