SSC Exam 2023: www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्र उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळांनी इ. 10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. तसेच प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असेही बोर्डाने आपल्या नोटीसमध्ये म्हंटले आहे. हॉल तिकिट्समध्ये काही चूक असल्यास प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. (SSC 2023 Exam Hall Ticket News)
प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे असेही सांगण्यात आले आहे. प्रवेशपत्र हरवले तर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरे प्रवेशपत्र द्यावं असे सांगण्यात आले आहे. तसेच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.