भंडारा : नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गरोदरमाता नोंदणी ते टिडी १६ वर्षापर्यंत लसीकरण करण्यात येते. गोवर, रुबेला लसीकरण अंतर्गत प्रथम डोजचे जिल्हातील उद्दिष्टे १७ हजार ५५० असून ऑक्टोबर अखेरपर्यंत १०हजार २६७ लाभार्थ्याना लसीकरण करण्यात आले आहे. गोवर रुबेला लसीकरण अंतर्गत दुसऱ्या डोजचे जिल्हातील उद्दिष्टे १७ हजार २०१ असुन ऑक्टोबर अखेरपर्यंत ८ हजार ५०२ लाभार्थ्याना लसीकरण करण्यात आलेला आहे. गोवर, रुबेला उद्रेक पासून बालकांचा बचाव करण्यासाठी ज्या बालाकांना गोवर, रूबेलाचा पहिला व दुसरा डोस दिलेला नसेल त्यांनी नजिकच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
नियमित लसिकरण, साँस मोहिम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व जन्म-मृत्यु नोंदणी या योजनांबाबतची आढावा बैठक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.साँस मोहिमे अंतर्गत पाच वर्षाखालील बाल मृत्यूचे प्रमाण विशेषतः न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे साँस मोहिम कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही मोहिम १२ नोव्हेंबर २-०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी व आशामार्फत ० ते ५ वर्ष लाभार्थ्यांना शोधमोहिम घेऊन राबविण्यात येणार आहे. न्युमोनियाचे लक्षणे आढळताच त्वरित वैद्यकिय सल्ला घ्यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
संपुर्ण राज्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासुन सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रथम जिवंत अप्रत्याकरिता पात्र लाभार्थी महिलेस ५ हजार रूपये रक्कम आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफीस मधील खात्यात (DBT) मार्फत तीन टप्यात जमा केली जाते. जिल्हयात पाच वर्षांच्या कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील ४० हजार ३३ लाभार्थ्यांच्या खात्यावर १८ कोटी १९ लक्ष ७ हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. यावेळी जन्म मृत्यृ नोंदणी, कोवीड लसिकरणाबाबतचा आढावा घेतला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.