'
30 seconds remaining
Skip Ad >

भाऊ... तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पानटपरींवर कारवाई | Batmi Express

0
wardha district,Wardha,Wardha live,wardha news,wardha jila,
  • 2 हजार ६०० रुपयाचा दंड वसूल

वर्धा: तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाने सावंगी मेघे येथे दवाखान्यासमोरील विविध टपरींवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ.नम्रता सलुजा, मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार, अमित तुपकाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नायक जितेश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली.


तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर अनेत प्रकारचे दुष्परिणाम होतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, हृदयविकास, कॅन्सरसारखे आजार हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे होत असतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो जो शरीराला हानिकारक ठरतो. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण हे लहान मुलांमध्ये वाढत आहे.

त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जाते. सावंगी मेघे येथे रुग्णालय परिसरातील पानटपरी, च्याय सुट्टा बार, स्मोकर शॉप व सिगारेट पिणाऱ्या अशा ८ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पानटपरीवर ही कारवाई करण्यात आली. यात ६  हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तंबाखू नियंत्रण कायदा २००३ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच २९ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सूपारी, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास व थुंकन्यास आणि धुम्रपान करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×