लग्न समारंभ आटोपुन येताना वडसा येथील चार युवकांचा अपघात | Batmi Express

Gadchiroli News,wadsa,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Accident News,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli Batmya,

 Gadchiroli News,wadsa,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Accident News,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli Batmya,


देसाईगंज
:-वडसा येथील लग्नसमारंभाचा स्वागत समारंभ असतानी वडसाकडे परत येत असतांनी गोंदियावरून सात किलोमीटर अंतरावरील ज़िबराटोला जवड वडसा देसाईगंज येथील चार युवकांचा अपघात झाला. क्रेटा CG 06GV 4141 या चारचाकी ने अपघातात त्यात चार युवक गंभीर जखमी झाले. असता त्यांना गोंदिया येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यात एकाची प्रकृती चिंताजनक होती त्यानंतर घटनेची माहिती देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू चावला यांना माहिती मिळतात रात्र बारा वाजता हे गोंदिया येथे दाखल झाले व घटनेची सविस्तर चौकशी करून विचारपूस करून त्या अपघातात मयूर गेडाम हे अतिशय गंभीर दुखापत झाले होते एकूण अपघातात चार व्यक्ती होते प्रिन्स अरोरा हे गाडी चालवत होत.

प्रिन्स अरोरा सोबत अतुल दुनेदार, मयूर गेडाम ,सुगत चिमणकर असे अपघात जखमी युवकांचे नाव आहेत. त्यामध्ये नंदू चावला हे गोंदिया येथे जाऊन सूयोग हॉस्पिटल येथे घटनेची आणि दुखापत ग्रस्त अपघात झालेल्या दुखापतीग्रस्त युवकांची माहिती घेतली. आणि त्यांच्या जवळील नाते गोंदिया येथील नातेवाईकासोबत संपर्क साधून त्या हॉस्पिटलमध्ये सर्व तो प्रयत्न परीने प्रयत्न केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मयूर गेडाम मयूर गेडाम वय वर्षे 25 वर्षे यांचे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता निधन झाले. मयूर गेडाम यांची अत्यंत गंभीर अवस्थेत दुखापत असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर मयूर गेडाम यांना वडसा येथे आणण्यात आले आणि अपघातात झालेल्या मयुर गेडाम उत्तरिय तपासणीसाठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणे त्याचबरोबर सविच्छेदन करणे इत्यादी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नंदू चावला यांनी कसोटीचे प्रश्न प्रयत्न केले काही हलगर्जीपणा झाल्यामुळे त्यांनी परिसरातील राजकीय नेत्यांच्या देखील या ठिकाणी मदत घेतला आणि संपर्क साधून त्यांनी या घटनेला लवकरात लवकर कसे निपटारा देता येईल. मृतदेह देसाईगंज कसे नेता येईल यासाठी त्यांनी कसोटी प्रयत्न केले.लगेच पोलिसांनी त्यांच्या या सर्व कार्याला प्रतिसाद देत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद केली.


त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये सविच्छेदन पूर्ण पार कडून नंदू चावला यांनी आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये मृतक मयुर गेडाम यांचे पार्थिव आणून रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी अंत्यविधीच्या कार्यक्रम पार पडला. यापूर्वीही अनेक अपघातामध्ये नंदू चावला आणि चावला बंधूंनी अनेकदा वेळोवेळी मदत करून रुग्णालय दाखल करणे .त्यांना उपचार मिळवून देणे त्याचबरोबर त्यांची सेवा सूचना करणे .असे अनेक प्रकारचे कार्यकर्त्यांनी यापूर्वी केले आहेत त्यामुळे त्यांनी या प्रकरणांमध्ये देखील माणुसकीचे दर्शन करून दिले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.