कोरची:- येथील स्थानिक पारबताबाई विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला असून संविधानाची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्याना चांगल्या सवयी लगाव्या म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून हरिश्चंद्र मडावी, वसंत गुरनूले, सुरज हेमके, तुळशीराम कराडे, जिवन भैसारे, महेश चौधरी, क्रुष्णामाई खुने, निर्मला मडावी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हरिश्चंद्र मडावी व संचालन जिवन भैसारे व आभार महेश चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामराव उंदीरवाडे, मुन्शीलाल अंबादे, कैलाश अंबादे, सुरेश जमकातन, पराग खरवडे आदींनी सहकार्य केले.