कोरची (तालुका प्रतिनिधी)- येथील वॉर्ड नं. ५ मध्ये दिनांक 02/11/2022 ला नवीन ए. टी. एम. चे उदघाटन करण्यात आले. तालुक्यातील ठिकाणी गावागावांतून अनेक वेगवेगळ्या कामांकरिता दुरदुरुन खूप लोक येत असतात. सर्वांना पैश्यांची गरज असते. बँकांमध्ये लोकांची गर्दी उसळते. पण ए. टी. एम. हा सर्वांना दिलासा देणारा असतो. लोकांचे काम पैश्याविना अळु नये किंवा वेळेची बचत म्हणून ए. टी. एम. चा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. कोरची शहरात दोन ए. टी. एम. असून कधी कधी काही कारणास्तव बंद असतात. तेव्हा रक्कम जवळ नसली तर अनेकांची फजिती होते. ही समस्या लक्ष्यात घेता रंजित सरजारे यांनी कोरची येथे नवीन हिताची कंपनीचे ए. टी. एम. सुरू करून लोकांना दिलासा दिला आहे.
दिनांक 02/11/2022 ला बँक ऑफ इंडिया शाखा कोरचीचे शाखाधिकारी मा. सतीश कावरे सर यांच्या हस्ते ए. टी. एम. चे शुभारंभ करण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्षा हर्षलताताई भैसारे, मा. मनोजभाऊ अग्रवाल, अविनाशभाऊ हुमने, चेतन कराडे नितीन रहेजा, भूमेश शेंडे व बहुसंख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.