ब्रम्हपुरी: गोसेखुर्द नहरातील पाण्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यु | Batmi Express

Bramhapuri,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Live,Chandrapur News LiveChandrapur Today,Bramhapuri News,Drowned,

Bramhapuri,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Live,Chandrapur News LiveChandrapur Today,Bramhapuri News,Drowned,

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील रानबोथली येथील गोसेखुर्द नहरातील पाण्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:-२०/११/२०२२ ला सकाळी:-११:०० वाजताच्या सुमारास घडली. अमृता संदीप मरस्कोल्हे वय वर्षे दहा इयत्ता ४ था वर्गातील मुलगी रानबोथली गावतील रहिवाशी असे नहरातील पाण्यात बुडून मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की सकाळी अमृता ही गोसेखुर्द नहराकडे कपडे धुवायला आजी व मोठी बहिणी सोबत गेली असता कपडे धुत असताना अचानक पाय घसरुन नहरातील पाण्यात पडली. नहरातील पाणी इतके खोल आहे की ती काही क्षणातच लुप्त झाली.अमृता सोबत असणाऱ्या आजी बहीण व काही महिलांनी नागरिकांना आवाज दिला माञ कुणीही जवळ नसल्यामुळे घटनास्थळाकडे धाव घेवू शकले नाही. लगेच काही महिलांनी गावात धाव घेत गावातील ग्रामस्थांना सर्व घटनेची आपबिती सांगितले. लगेच घटना स्थळाकडे धाव घेत पाणपुड्याच्या साह्याने अमृताचा शोध घेतला व काहीच वेळातच अमृताचा मृतदेह गोसेखुर्द नहरातील पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. व ही माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. माहिती देताच घटना स्थळाकडे धाव घेत अमृताच मृतदेह ताब्यात घेत उत्तरिय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय येथे नेण्यात आले. व प्राप्त माहिती नुसार उत्तरिय तपासणी करून अमृताच मृतदेह मरस्कोल्हे कुटुंबाकडे सोपविण्यात आले. व अमृतावर  अंत्य संस्कार करण्यात आले.
अमृताच्या पच्छात्य कुटुंबात आई, बाबा, भाऊ, बहिण आजी आजोबा असा आप्त परिवार असुन वर्गातील हुशार मुलगी व मनमिळावू स्वभावाची व कुटुंबातील लाडकी मुलगी होती.
अमृताच्या जाण्याने मरस्कोल्हे कुटुंब तसेच शिक्षक, शिक्षिका वर्ग मिञ मैत्रिणी व गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे.
घटनेचा पुढील तपास संबधीत पोलिस विभगाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.