ब्रम्हपुरी: अखेर नरभक्षक SAM-II वाघ जेरबंद.! | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Tiger Attack,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Tiger Attack,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

ब्रम्हपुरी
:- वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रामध्ये दिनांक 28/06/2022, 16/08/2022 17/08/2022 व दि. 04/11/2022 रोजी वाघाच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीमध्ये कॅमेरा ट्रॅप छायाचित्रावरून SAM-II या नर वाघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सदर वाघाचा शेतशिवार परिसरात नियमित वावर असल्याने व मानवी जीवीतास धोका कायम असल्याने SAM-II वाघास (नर) जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

त्याअनुषंगाने, दिनांक 08/11/2022 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्र / सायगाटा नियतक्षेत्रामध्ये (कक्ष क्र. 118) सायं 7.06 वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर तथा प्रमुख RRT व श्री अजय मराठे, शुटर, RRT सदस्य यांनी SAM-II वाघ (नर) याला डार्ट केले व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास त्यांचे चमुचे सहाय्याने पिंज-यात जेरबंद केले.
सदरची कार्यवाही श्री दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री एम बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी, श्री एम. बी. गायकवाड, वनक्षेत्रपाल (प्रा) उत्तर ब्रम्हपुरी, श्री आर. डी. शेंडे, वनक्षेत्रपाल (प्रा) दक्षिण ब्रम्हपुरी, वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी, तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य श्री बी. आर. दांडेकर, श्री ए. एन. मोहुर्ले, श्री एस. पी. नन्नावरे, श्री ए. डी. तिखट, श्री ए. डी. कोरपे, श्री ए. एम. दांडेकर, श्री दिपेश टेंभुर्णीकर, श्री नुर सैयद व श्री राकेश अहुजा ( फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली.
जेरबंद करण्यात आलेल्या SAM-H वाघ (नर) चे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून सदर वाघाची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याला ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे हलविण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.