Maharashtra Corona Havoc: राज्यात दिवसभरात १८८५ नव्या कोरोना बाधितांची नोंद, मुंबईत १११८ रुग्णांची नोंद | Be Media

Coronavirus Live Updates,Maharashtra Coronavirus,Mumbai,Mumbai Corona,Coronavirus Live,Covid-19,Coronavirus Live Maharashtra,Corona Outbreak Maharastr

Coronavirus Live Updates,Maharashtra Coronavirus,Mumbai,Mumbai Corona,Coronavirus Live,Covid-19,Coronavirus Live Maharashtra,Corona Outbreak Maharastra,Corona,Maharashtra,Corona Update Maharastra,

मुंबई ( Maharashtra Corona Havoc : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patients) खूप वाढ होत आहे. सोमवारी राज्यात १८८५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. (Maharashtra Corona Update) यातील १११८ रुग्ण हे मुंबईतील (Mumbai) आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

आज राज्यात १८८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ७७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातले आहेत. मुंबईत आज १११८ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज एकूण ७७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण ७७,४७, १११जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.९१ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका झाला आहे.

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण १७४८० सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे ११३३१ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये ३२२२ इतके सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत बी. ए. ४ चे तीन आणि बी. ए. ५ व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.