मूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन क्षेत्रात येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील मदनापूर येथे घडलेली ही तिसरी घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.
पळसगाव (पिपर्डा) : शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेलं होतं . पण काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक शेतकऱ्यावर हल्ला केला. यात शेतकरी जखमी झाला. चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन क्षेत्रात येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील मदनापूर येथे घडलेली ही तिसरी घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.
उन्हाळा संपून पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे. मात्र पाऊस आलेला नाही, तरीही तप्तउन्हात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सत्यवान गोवारी घोडाम (५७) रा. मदनापूर हे शेतातील कामे करण्यासाठी शेतात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. बाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे वाघाने पळ काढला. मदनापूर परिसरातील वाघ हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी विहीरगाव येथील शंकर धाडसे आणि अमित ननावरे या दोन युवकावर, तर मागील आठवड्यात मदनापूर येथील प्रभू गजभे या गुराख्यास वाघाने जखमी केले होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.