ब्रम्हपुरी - आरमोरी मुख्य महामार्ग वैनगंगा नदिघाट पुलाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात तरंगताना आढळला | Be Media

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Suicide,Bramhapuri Marathi News, suicide,Armori,Armori News,Armori Suicide,
Bramhapuri Suicide,Bramhapuri,Bramhapuri Live,suicide,Bramhapuri Marathi News,Armori Suicide,Bramhapuri News,Armori,Armori News,



ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी- आरमोरी मुख्य महामार्ग वैनगंगा नदिघाट पुलाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात तरंगताना आढळल्याची घटना आज दिनांक :-६/६/२०२२ ला सकाळीं ८: ००वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर वृत्त्त असे आहे की, आज सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी आरमोरी मुख्यमहामार्गावर आवागमन करीत असलेल्या प्रवाशांना वैनगंगा नदिपात्रात एक अज्ञात इसम पाण्यावर तरंगत जात असल्याचे दिसल्याने अचानक बघ्यांची गर्दी उसळली आहे. 

सद्या वैनगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी दोन दिवस वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने अज्ञात इसमाचा मृतदेह हा पाण्यावर तरंगत जात असतांना नदीपात्रात असलेल्या झुडपाना अज्ञात इसमाचा मृतदेह अडकला आहे.

घटनेचे माहिती संबधित पोलिस विभागाला देण्यात आली असून लवकरच पोलिस विभागाची चमू घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अज्ञात इसमाची ओळखं पाण्यातून बाहेर काढल्यानंतरच पटनार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.