'
30 seconds remaining
Skip Ad >

सिंदेवाही: अंगणात झोपलेल्या पती-पत्नी समोर आला वाघ, समोर काय झालं एकदा वाचा - Batmi Express

0

 Sindewahi,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Maharashtra,Chandrapur Tiger Attack,

सिंदेवाही - उन्हाळा लागला की वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने येतात मात्र हे वन्यप्राणी गावात आले की मानव-वन्यजीव चांगलाच हाहाकार होतो. शहर असो की ग्रामीण भाग उन्हाळ्यात वन्यजीव, असो की पाळीव प्राणी पाण्याच्या शोधात कुठेही जातात. 

सिंदेवाही तालुक्यात मागील आठवड्यात घरी झोपलेल्या महिलेच्या घरात वाघाने आपली उपस्थिती दर्शवित त्या महिलेला ठार केले. ( Sleeping Women Killed In Tiger attack ) अंगणात झोपलेल्या एका वृद्धाला सुद्धा वाघाने ठार केले, ( Sleeping old man Killed In Tiger attack ) 

आता तर हद्दच झाली सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी परिसरात वाघाचा संचार सुरू आहे. अशातच गडमौशी येथील पती- पत्नी हे उन्हाळ्याच्या गर्मीमुळे अंगणात झोपले होते. सोमवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ तिथे आला. त्याच्या गुरगुरण्याने हे दाम्पत्य जागे झाले. पाहिले तर चक्क समोर वाघ बसला होता. वाघाला समोर बघताच सदर दाम्पत्याची चांगलीच भंबेरी उडाली.

वाघाच्या भितीने जीव वाचविण्यासाठी दोघांनीही आरडा ओरडा केला. यामुळे गावातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी वाघाला पळवून लावले. सध्या गावकरी घराच्या अंगणात झोपत आहेत. जंगल परिसर लागून असल्याने पहाटेच्या सुमारास पट्टेदार वाघाने गावाकडे धुम ठोकली. पती-पत्नी झोपून असताना शेजारच्या गोठ्यात शेळ्या बांधून होत्या. आवाज ऐकून दोघेही उठून बसताच अंगणात पट्टेदार वाघ समोर उभा ठाकल्याने मात्र, आरडा ओरड करत लोकांना गोळा केल्याने मोठा अनर्थ टळला असेच म्हणावे लागेल. परंतु, आता या परिसरात अंगणात झोपणे महागात पडू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×