कढोली परिसरातही तेंदूपत्ता संकलनाकरीता जंगलात गेलेल्या नागरिकांना सती नदी घाटावर अचानक वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांची एकच भंबेरी उडाली.
कढोली :- देसाईगंज व आरमोरी तालुक्यात वाघाची दहशत सुरूच असतानाच तालुक्यातील कढोली परिसरातही तेंदूपत्ता संकलनाकरीता जंगलात गेलेल्या नागरिकांना सती नदी घाटावर अचानक वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांची एकच भंबेरी उडाली. ज्या नागरिकांना वाघ दिसला त्यांनी एक नारा अतिशय तीव्र आवाजात म्हणाला
आलारे आला वाघ आला… आलारे आला वाघ आला…पळा, पळा
असे म्हणत घराचा रस्ता धरला.
सध्या उन्हाचा पारा 45 अंशाच्या वर गेल्याने वनविभागाने बांधलेले जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे अनेक प्राणी आपली तहान भागविण्यासाठी नदी, नाल्यांचा आसरा घेवून गावालगत येत आहेत. असाच प्रकार कढोली परिसरात शनिवारला दिसून आला. कढोली परिसरात सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरु आहे.
शनिवारला कढोली व वाढोणा परिसरातील काही नागरिक तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेले असता, त्यांना सती नदीच्या घाटावर चक्क वाघाचे दर्शन झाले. वाघाला पाहताच नागरिकांची भंबेरी उडाली. ज्यांनी वाघाला बघितले त्यांनी इतर नागरिकांना सतर्क करीत वाघ आला….पळा म्हणून घराचा रस्तापकडला. वाघाच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहेत. कढोली, वाढोणा, भगवानूपर ग्रामपंचायतीने दवंडी देवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.