'
30 seconds remaining
Skip Ad >

सिंदेवाही: दोन ट्रकांची समोरा-समोर जबर धडक; दोन्ही चालक गंभीर जखमी | Batmi Express

0

Sindewahi,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,

सिंदेवाही
:- येथील जुन्या स्मशानभूमीजवळील पुलावर चंद्रपूर व नागपूरवरून येणार्‍या दोन ट्रकांची समोरासमोर जबर धडक बसली. ही घटना रविवारी, सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास घडली. अपघातात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती.

चंद्रपूरकडे एमएच 34 एबी 2521 क्रमांकाचा ट्रक जात होता. तर, एमएच 34 एबी 7988 क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात होता. या दोन ट्रकची स्मशानभूमी जवळील पुलावर समोरासमोर धडक बसली. यात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. या अपघातमुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावरील दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शेकडो नागरिक अडकून पडले होते.

अपघाताची माहिती कळताच सिंदेवाही पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व जमलेल्या लोकांना घटनास्थळावरून दूर केले. त्यानंतर दोन्ही ट्रकच्या चालकांना उपचाराकरिता रुग्णालयात पाठवले. क्रेन व एक जेसीपीच्या मदतीने दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. जवळपास 4 तासाच्या प्रयत्नानंतर हा मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात दोन्ही ट्रकांची समोरील बाजू चकनाचूर झाली. अपघातग्रस्त ट्रकच्या एका चालकावर सिंदेवाही येथील सामान्य रूग्णालयात, तर दूसर्‍यावर चंद्रपूर येथील सामान्य रूग्णाल्यात उपचार सुरू आहे. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×