आरमोरी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी येथील नंदू गोपाळा मेश्राम मू. आरमोरी (बर्डी) अंदाजे वय 54 वर्ष हे नेहमीप्रमाणे आज सकाळी आपल्या वडसा रोडवरील iti जवळील शेताकडे गेले होते ते आपल्या शेतामध्ये उन्हाळी धानाची लागवड केले होते. त्यांचा शेत घरलाच लागुन आहे.आता धान कापणीला आल्यामुळे आज सकाळी 7.00 सुमारास शेतातील पाणी काढण्यासाठी गेले असता शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात ते जागीच ठार झाले . नंदू मेश्राम यांना वाघाने दोन बांद्या पर्यंत ओढत नेल्याची घटनास्थळी दिसत आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे. कालच अरसोडा येथील महिलेला ठार केल्याची घटना घडली असताना आज सुद्धा वाघाने पुन्हा एकाला ठार केल्याने मोठी दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाविषयी प्रचंड आक्रोश निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा नरभक्षक वाघाचा तात्काळ वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. घटनास्थळी वनविभागाची टीम पोहचल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वन विभागाच्या वतीने पुढील कारवाई सुरू आहे.