नागपूर : पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला, त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला एकदम त्याने वेगळा प्रकारचा विषय समोर आणलं आहे. कदाचित त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. पेट्रोल- डिझेल वर राज्याचा कर २९ रुपये आणि केंद्राचा कर १९ रुपये राज्याचा कर का कमी करत नाहीत ? पवार साहेबांनी या गोष्टीचे उत्तर दिले पाहिजे. सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचे काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच सरकार करत आहे. असा घणाघात विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी केला आहे.
२९ रुपये कर पेट्रोल- डिझेल वर लावून १ रुपये देखील कमी न करता हे लोक महागाई संदर्भात बोलु कसे शकतात. याचे मला आश्चर्य वाटते. अशी टिकाही त्यांनी केली.