मे २३, २०२२
0
गडचिरोली:- कुलगुरु महोदयांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा संदर्भात विद्या परिषदेची तातडीची सभा दिनांक २३ मे, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता आभासी पध्दतीने आयोजीत करण्यात आलेली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या परीक्षा दिनांक १/६/२०२२ पासून विश्लेषनात्मक (Descriptive) पध्दतीने घेण्यात येणार असून परीक्षेचे वेळापत्रक सुध्दा घोषीत करण्यात आलेले आहे. या परीक्षा पध्दतीबाबत विविध संघटनाकडून निवेदन प्राप्त झालेले असून महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाने परीक्षा पध्दतीबाबत घेतलेल्या निर्णयाचा अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षा पध्दतीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याकरीता सभेला विद्यापरिषदेचे सदस्य व निमंत्रीत सदस्यांनी आभासी (Online) पध्दतीने उपस्थित राहणार आहेत.
आभासी (online) बैठकीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष......
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या परीक्षा दिनांक १/६/२०२२ पासून विश्लेषनात्मक ( Descriptive ) पध्दतीने घेण्यात येणार असून परीक्षेचे वेळापत्रक सुध्दा घोषीत करण्यात आले. मात्र विद्यार्थी संघटनेचे याचा विरोध दर्शवित कुलगुरूंना निवेदन दिले. त्यामुळे कुलगुरु महोदयांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची तातडीची सभा दिनांक २३ मे, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता आभासी पध्दतीने आयोजीत करण्यात आलेली आहे. या सभेत परीक्षा नेमकी कशापध्दतीने घेण्यात येणार या बद्दल चर्चा होणार असल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.