Corona Fourth Wave: राज्यात कोरोनाची चौथी लाट : आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती | Batmi Express

Corona Fourth Wave,Corona,Coronavirus Live,Coronavirus Live Maharashtra,Maharashtra Coronavirus,Coronavirus Live Updates,Covid-19,Maharashtra,Nagpur,

Corona Fourth Wave,Corona,Coronavirus Live,Coronavirus Live Maharashtra,Maharashtra Coronavirus,Coronavirus Live Updates,Covid-19,Maharashtra,Nagpur,

नागपूर : 
राज्यावर अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. कालच्या दिवसात राज्यात 326 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे देशात ओमायक्रॉनच्या  BA.5 चेही एक प्रकरण समोर आले आहे. यामुळे राज्याच चौथी लाट येणार का यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. 

राज्यात कोरोनाचा धोका किती आहे त्याचप्रमाणे चौथी लाटेची कितपत शक्यता आहे, यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. 
राजेश टोपे म्हणाले, कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. कोरोनाच्या रूग्णांची नोंद होतेय, कारण लोकं गर्दी करतायत, मेळावे भरतायत तसेच राजकीय कार्यक्रम होत असून इथे लोकं एकमेंकांना भेटतायत. मात्र अपेक्षेप्रमाणे रूग्णसंख्येत वाढ होत नाहीये.
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाच्या रूग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचे कारण नाहीये. कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.