'
30 seconds remaining
Skip Ad >

वैरागड- आरमोरी महामार्गावर ट्रॅक - ट्रॅक्टरचा झाला अपघात - Batmi Express

0

Armori,Armori Live,Armori News,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

वैरागड
: - येथून आरमोरी मार्गावर जाणाऱ्या अवघ्या काही अंतरावर पाच पांडव वळणावर आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आरमोरीकडे जाणाऱ्या पियस + न्यू हॉलंड ३०३७ या ट्रॅक्टरला मागून एका ट्रकने धडक दिली. ट्रॅक्टर रस्त्याखाली पलटी मारल्याने तिघे जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार मालेवाडा येथून आरमोरी येथे लग्न मंडप कामाचे साहित्य घेऊन पियस + न्यू हॉलंड ३०३७ ट्रॅक्टर जात होते. वैरागड जवळील पाच पांडव वळणावर एका अज्ञात ट्रकने ट्रॅक्टरला मागून धडक देऊन पसार झाला. धडक येवढी जबरदस्त होती की ट्रॅक्टर रस्त्याखाली उलटी पलटली. यात ट्रॅक्टरवर सवार सचिन हेलाऊट (वय २७ वर्षे) रा. आरमोरी, पवन राऊत (वय २२ वर्षे) रा. आरमोरी आणि खेमाराज पत्रे (वय 22 वर्षे) रा. देऊळगाव यांच्या हात-पायाला जबर मार लागल्याने वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे पाठविण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×