मारेगाव : दोन दिवसांपूर्वी घरून बेपत्ता झालेल्या व नुकतीच १२ वीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी गावाशेजारी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याच्या स्थितीत आढळून आली. ही घटना मारेगाव तालुक्यातील बोटोनी लगत गोदाम पोड या कोलाम वस्तीत उघडकीस आली. कु.अस्मिता गोपाल टेकाम (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. फिर्यादी गोपाल भीमा टेकाम वय ४५ वर्ष रा. गोदाम पोड बोटोनी येथील रहिवाशी आहे. त्यांना चार मुली व एक मुलगा असून एका मुलीचा विवाह झाला असून एका मुलीचे लग्न जुळल्याने घरी विवाह कामाची धावपळ सुरु आहे.
Read Also: Suicide: महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
अशा स्थितीत १२ एप्रिल रोजी बैल घरी न आल्याने बैल शोधण्यास जातो असे सांगून अस्मिता ही घरून निघून गेली. त्यानंतर ती घरी परत आलीच नाही. दोन दिवसापासून घरचे लोक तिचा शोध घेत होते. पण, ती मिळाली नाही. दरम्यान १४ एप्रिलचे सकाळी ७ वाजताच्या दरम्यान गावा लगतच्या नाल्यातील आजनाचे झाडास दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अस्मिताचा मृतदेह आढळला. ही गोष्ट कुटुंबियांना कळताच त्यांनी मारेगाव पोलिसाना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करित प्रेताची उत्तरणीय तपासनी करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियाचे स्वाधीन केला. १२ वीची परीक्षा दिलेली मुलगी घरून गायब होने, दोन दिवस बेपत्ता राहणे आणि दोन दिवसांनी गावा शेजारीच गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आल्याने पंचक्रोशीत खळबळ निर्माण झाली आहे. तसेच, या बाबतीत बऱ्याच शंका निर्माण होत आहे.