'
30 seconds remaining
Skip Ad >

रेती डंपीग साईडवर पोकलॅंड ऑपरेटरचा मृत्यू, रात्री सुरू होती मालाची उचल - Be Chandrapur

0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,

पोंभूर्णा
:- पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी येथे रेती डंपीग साईडवर रेती भरून असलेल्या ट्रकला पोकलॅंडच्या मदतीने बाहेर काढत असताना झालेल्या अपघातात एका पोकलॅंड ऑपरेटरचा मृत्यू झाला.

सदर घटना दि.११ एप्रिलला रात्री दिड वाजताच्या सुमारास घडली. भिमणी येथील घाटाचा लिलाव नसतांनाही तिथे डंपींग साईट तयार करून रेती उचल करण्यात येत होती.प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकून रेती घाट मालकांनी अवैधरित्या हा रेती उचल करण्याचा गोरखधंदा सुरू केले असल्याची ओरड परिसरातून होत आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी येथे मागील काही महिन्यांपासून निलकंठ गिरसावळे यांच्या शेतात रेती डंपिंग साईडवर रेती स्टाक करणे सुरू होते. याच साईडवरून रेती हायवा, ट्रक व ट्रक्टर ने रेतीची उचल करण्यात येत होती.

दि.११ एप्रिलला रात्री दिड वाजताच्या सुमारास रेती भरलेला ट्रक डंपींग साईडवर फसला त्याला काढण्यासाठी पोकलेनच्या मदतीने काम सुरू होते. पोकलेन ऑपरेटर अमोल बबन नंदनकर रा. चंद्रपूर हा पोकलेनच्या खाली उतरून दुसऱ्या व्यक्तीला पोकलेन चालवायला दिला होता. मात्र ट्रकला बाहेर काढतांना पोकलेनचा बुम सरकल्यामुळे खाली असलेल्या ऑपरेटर अमोल ट्रक व पोकलेन च्या मध्ये फसला. यात त्याला जबर मार लागला. तात्काळ त्याला वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले मात्र बामणी जवळ त्याची प्राणज्योत मालवली. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सदर घटनेचे मर्ग चंद्रपूर सिटी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास घटनेचे कागदपत्रे प्राप्त होताच पोंभूर्णा पोलिस करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×