'
30 seconds remaining
Skip Ad >

Mask Compulsion In Maharashtra: महाराष्ट्रात मास्क पुन्हा अनिवार्य होणार? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, वाचा काय म्हणाले तर… | Batmi Express

0

Mask Compulsion In Maharashtra,Covid-19,Maharashtra,India,coronavirus,Coronavirus Live,Maharashtra Coronavirus,Mumbai,Mumbai News,Mumbai Live,

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात आरोग्यमंत्रीही सहभागी झाले होते. या बैठकीत जगातील कोरोना स्थिती, जगाच्या तुलनेत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव याबाबत चर्चा आणि प्रेझेंटेशनही झालं. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत मास्क वापराबाबत चर्चा होऊ शकते. मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात येऊ शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच राज्यात टेस्टिंगमध्ये वाढ, गरज भासल्यास जिनोमिक सिक्वेन्सिंग, ट्रॅक टेस्ट आणि लसीकरणात वाढ करण्यात येणार असल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.

देशात आता ६ ते १२ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याची परवानगी आयसीएमआरने दिली आहे. त्यासाठीचे डिटेल रुल्स अद्याप पाठवलेले नाहीत. जसे ते येतील त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करेल, असंही टोपे यांनी सांगितलं. साधारणपणे १२ – १५ आणि १५ – १७ हा शाळेत जाणाऱ्या वयोगटाच्या लसीकरणाबाबत आपण देशाच्या सरसरीच्या तुलनेत कमी आहोत. त्यामुळे पालक आणि शाळांना विश्वासात घेऊन त्या वयोगटातील लसीकरण वाढवायचं आहे. प्रिकॉशन डोससाठी जनजागृती करणार आहोत. सर्वांनी प्रिकॉशन डोस घ्यावेत, अशी विनंतीही राजेश टोपे यांनी यावेळी केली.

महत्वाची बाब म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक केला जाऊ शकतो. संध्याकाळी मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर मास्कबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारणीला सुरुवात केली आहे. आपण सक्ती जरी करत नसलो तरी त्याबाबत आग्रही राहण्याची शक्यता आहे. इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्सीबिलिटी प्रोगॅममध्ये लागणाऱ्या खर्चात महाराष्ट्र देशाच्या सरकारीच्या तुलनेत नक्कीच पुढे आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याबाबत चर्चा झाली. कोरोनाबाबतची सगळी यंत्रणा तयार राहावी याबाबत निर्देश देण्यात येतील, असंही टोपे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×