महाविद्यालयाचा अभ्यासक्रम अपूर्ण! गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२२ च्या लेखी परीक्षा पध्दतीबाबत नविन परीपत्रक जाहीर - Batmi Express

Gondwana Summer 2022 Exam Offline,Chandrapur,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli
Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Chandrapur,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marathi News,

    चंद्रपूर/गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, पदव्युत्तर शैक्षणिक विभागप्रमुख विद्यार्थी तथा संबंधितांना कळविण्यात येते की, विद्यापीठाने निर्गमीत केलेले परीपत्रक जा.क / गो.वि. / परीक्षा विभाग / २८१३ / २०२२ दिनांक २२/०४/२०२२ याद्वारे रद्द करण्यात येत आहे.

    विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या उन्हाळी -२०२२ च्या लेखी परीक्षा दि. ०१/०६/२०२२ पासून प्रचलित पध्दतीने घेण्यात येणार असून त्या विद्यापीठाने जाहिर केलेल्या यादीतील परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील (यादी संलग्नित) अभ्यासक्रम निहाय परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाद्वारे लवकरच घोषित केल्या जाईल. प्रत्येक परीक्षा अभ्यासक्रम निहाय घेण्यात येईल.

    Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Chandrapur,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marathi News,

    परीक्षा तीन तासाची असली तरी प्रत्येक तासामागे १५ मिनिटे अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याकरिता देण्यात येईल म्हणजेच एका पाळीतील पेपरची वेळ ३.४५ तास असेल. सर्व परीक्षा दोन पाळीत घेण्यात येतील. परीक्षेचे पेपर संपूर्ण अभ्याक्रमावर आधारित असेल.

    विद्यार्थ्यांच्या माहिती करिता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. यासंबंधात मा. प्राचार्यांनी परीक्षेबाबतची कार्यपध्दती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरीता महाविद्यालय स्तरावर नियोजन करावे.

    टिप्पणी पोस्ट करा

    कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.