साकोली: 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेला स्टॅम्प आणण्यासाठी पाठवलं होत. दारूच्या नशेत तर्र असलेल्या पोलिस पाटलाने अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चिंगी येथे घडली. साकोली पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस पाटलावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हि घटना चिंगा गावात पोलिस पाटील यांच्या घरासमोरच महिला बचतगटाची बैठक सुरू होती. यावेळी गटातील महिलांना स्टॅम्प पाहिजे असल्याने त्यांनी 13 वर्षीय बालिकेला पोलिस पाटील यांच्या घरी पाठविले. यावेळी पोलिस पाटील हा दारू पिऊन तर्र असल्याने त्याने बालिकेसोबत छेड खानी करून तिचा विनयभंग केला. या घटनेची माहिती पीडित बालिकेने आपल्या वडिलांना दिली.
वडिलांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पोलिस पाटील संजय रामटेके यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सेलोकर करीत आहेत.