चंद्रपूर: निवडणूक लांबणीवर रस्ता टांगणीवर - Batmi Express

Korpana,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Korpana,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

कोरपना ( Korpana )
:- कोरपना तालुक्यात सध्या झपाट्याने फलक अनावरण होत असून मात्र काम सुरू असतांनाच तालुक्यातील बोरगाव येथे विचित्र घटना घडून आले. 

पंचायत राज व्यवस्थे मध्ये महत्त्वाचा गाभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वेळेवर सहा महिने सामोर गेल्याने कोरपना तालुक्यातील मौजा बोरगाव खुर्द ते बोरगाव बु. यासाठी एकूण 30 लक्ष रुपये मंजूर करून रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी कच्चा मटेरियल गिट्टी यासारखे कच्चामाल टाकल्यानंतर संबंधित कामावरून गिट्टी काढण्यात आले त्यामुळे संपूर्ण बोरगाव वासियांना चिंतेचा प्रश्न पडला की विकास म्हणजे फक्त निवडणुकीच्या तोंडावर दिसणारा का? असा अर्थ समजायचं काय? 30 लक्ष रुपये एवढा निधी मंजूर केल्यानंतर टाकलेली गिट्टी कंत्राटदाराकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून परत उचलून नेले याचा अर्थ अजूनही नागरिकांना कळलेला नाही त्यामुळे नागरिक अजूनही संभ्रमात आहेत.

विशेष म्हणजे राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांनी स्वतः या फलकाचे अनावरण केले त्यामुळे आमदार साहेब या प्रश्नाकडे लक्ष देतील का? असा बोरगाव वासियांचा यांचा प्रश्न आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.