नागपूर : नागपुरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाचे आणखी एक घृणास्पद कृत्य समोर आले आहे. एका साठ वर्षीय वृद्धाने केवळ सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत त्याने हे कृत्य केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा वयस्क व्यक्ती घरी कुलर दुरुस्तीसाठी आलेला होता. तर, देवदास नामदेव वाघमारे असे या इलेक्ट्रिशियन (Electrician) नराधमाचे नाव आहे. देवदास वाघमारे हा ६० वर्षांचा आहे. तर, ती चिमुकली मुलगी फक्त सहा वर्षाची आहे.
२९ मार्च रोजी दुपारी तो त्यांच्या घरी कुलर घेऊन आला. चिमुरडीची आई व आजी आपआपल्या कामावर गेल्या होत्या. देवदासची वाईट नजर त्या चिमुकलीवर पडली. त्याने तिला घरात आणून आतून दार बंद करून तिच्यावर अत्याचार केला. तर, याहून अधिक म्हणजे जर कुणाला सांगितले तर, तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. हे वाईट कृत्य करून देवदास कुलर दुरुस्त (Cooler Repair) न करताच तेथून निघून गेला. जेव्हा या चिमुकलीची आई व आजी घरी परतल्या तेव्हा संध्याकाळी या चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा, त्वरित अजनी पोलीस (Ajni Police) ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.