मा.ना.श्री.नवाब मलिक यांच्या अटकेचा नागभीड महाविकास आघाडी तर्फे निदर्शने करून केला जाहीर निषेध |
- केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले
नागभीड ( Nagbhid News ) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. नवाब मलिक यांना आकसापोटी ईडीने अटक केली असल्याने सदर घटनेचा महाविकास आघाडी तर्फे निषेध व्यक्त करन्यात आला. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रियाज शेख तालुका विनोदभाऊ नवघड़े शिवसेना तालुका अध्यक्ष भोजराज नानबोनवार कांग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी शहर अध्यक्ष डॉ रविद्रजी कावळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विश्राम गृह ते राममंदिर मुख्य रस्त्यावर समोर केंद्र शासनाच्या ई.डी. व सी.बी.आय. च्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करून आंदोलन केले. व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय जनता पार्टी तथा केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. ईडीचा दुरुपयोग करुन देशात चूकीचा पायंडा पाडत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. केंद्रातील भाजपा सरकार मनमानी कारभार व हुकूमशाही पध्दतीने, सूडबुध्दीने ईडीचा गैरवापर करीत आहे. केंद्राच्या अखत्यारीतील सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून मंत्र्यांना व महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.या सर्व गोष्टींचा नागभीड महाविकास आघाडी तर्फे निषेध करण्यात आला.
सदर आंदोलनात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख,जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख जिल्हा संघटक भाऊरावजी डांगे,युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे, विधानसभा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोनकुसरे,सेवादल तालुका अध्यक्ष रामभाऊ शहाने, कामगार सेलचे तालुका अध्यक्ष श्रीराम सहारे,युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे महिला जिल्हा उपाध्यक्ष नारायनेताई, महिला तालुका अध्यक्ष रेवतकरताई,शहर अध्यक्ष वनिताताई सोनकुसरेताई,सुकेशनीताई खापर्डे, तसेच कांग्रेस व शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.