सिंदेवाही: तंटा मुक्त समिती वासेरा च्या वतीने प्रेमीयुगलांचा विवाह सोहळा संपन्न - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Sindewahi,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News LiveChandrapur Today

Sindewahi,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News LiveChandrapur Today,

सिंदेवाही
:- तालुक्यातील वासेरा येथील तंटामुक्त समितीच्या माध्यमातून विजातीय प्रेमी युगलाचा विवाह तंटामुक्त समितीच्या उपस्थिती आज दिनांक ११/०१/२०२२ ला वासेरा येथील आयु,संगरत्न बंडू बन्सोड वय 23 वर्ष वासेरा या मुलीचे व अनुराधा शरद टिंगसले ता. मूल जिल्हा चंद्रपुर येथील वय 19 वर्ष या मुलीसोबत गेल्या काही वर्षात प्रेम असल्यामुळे मुलीने थेट मुलाचे गावी वासेरा ता. सिंदेवाही येथे आज प्रेमी युगलाने लग्न करण्याचे ठरविले.

त्यानुसार त्यांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक बोरकर व सुनीलदत्त घाटे सचिव, देवेंद्र तलांडे पोलीस पाटील व समितीचे सर्व सदस्य यांच्याकडे लग्न लावून देण्यास विनंती अर्ज करुन वयाचे कागदपत्रे सादर केले. त्यानुसार दोघेही लग्नायोग्य असून वयाने पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचे बौद्ध धर्माच्या रितिरिवाजानुसार लग्न लावण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी नविन जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिला. यावेळी गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.