गडचिरोली: झाडाला दुचाकी धडकून मुलगा ठार तर 2 जण गंभीर जखमी - Batmi Express

kurkheda,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Accident News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,


कुरखेडा
:- तालुक्यातील सोनसरी – वाशी मार्गावर खपरी ते कोसीदरम्यानच्या वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन पळसाच्या झाडाला धडकल्याने एक ११ वर्षीय मुलगा ठार झाला. याशिवाय त्याचे वडील आणि दुचाकीवरील आणखी एक इसम असे दोघे गंभीर जखमी झाले . हा अपघात शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले आहे.

राजेंद्र हलामी हे सोनसरी येथे आपल्या आईकडे राहत असलेल्या मुलाला दुचाकी ( क्रमांक एमएच ३५ , आर ७७२६ ) ने सोनसरी येथून स्वगावी कोसी येथे घेऊन जात होते. दरम्यान खपरी कोसी मार्गावरील वळणावर दुचाकी अनियंत्रित झाली आणि हा अपघात घडला. आयुष राजेंद्र हलामी ( ११ वर्षे ) , रा . कोसी असे मृत मुलाचे नाव आहे. 

जखमींमध्ये त्याचे वडील राजेंद्र नरसू हलामी ( ३२ वर्षे ) आणि दुचाकी चालक अपघातग्रस्त दुचाकी अशी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली होती . रवींद्र परसराम जुमनाके ( ३४ वर्षे ) यांचा समावेश आहे. रस्त्यालगतच्या पळसाच्या झाडाला धडकल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या मुलाला जबर मार लागून जागीच ठार झाला . गावकऱ्यांच्या मदतीने सर्वांना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आले . तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.