पाळण्याच्या दोरीचा गळफास बसला; 21 तरुणीचा तडफडून मृत्यू

पाळण्याच्या दोरीचा गळफास बसला; 21 तरुणीचा तडफडून मृत्यू ,

पाळण्याच्या दोरीचा गळफास बसला; 21 तरुणीचा तडफडून मृत्यू ,

अकोला (Akola) :
झोका घेताना पाळण्याच्या दोरीचा गळफास लागून डीएड विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास रिधोरा येथे घडली. कल्याणी दिपक पोटे असं मृत तरुणीचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे ही दुर्दैवी घटना घडली.

 (ads1)

हे सुद्धा वाचा .. 

धक्कादायक! आईने एक दिवसीय नवजात मुलीला कुत्र्याच्या पिल्लांजवळ सोडले, कुत्रीने आपलं मूल समजून रात्रभर सांभाळले ...

रिधोरा येथील डीएडला शिकणारी कल्याणी ही सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातील पाळण्यावर बसून झोके घेत होती. तर तिची आई घराच्या गच्चीवर कामात होती. कल्याणीचे वडील बाहेरगावी ड्यूटीवर गेले होते. त्यामुळे तिच्या जवळ कोणीही नव्हते. टाईमपास म्हणून ती एकटीच पाळण्यावर बसून झोके घेत होती. पाळण्याच्या दोरीवर उशी टाकून ती बसलेली होती. अचानक उशी सरकल्याने ती खाली कोसळून बेडच्या काठावर पडली आणि पाळण्याची दोरी दुर्दैवाने तिच्या गळ्याभोवती अडकली.

 (ads1)

तिच्या गळ्याला बेडचा जबर मार लागला. काही वेळ ती तशीच पडून होती. काही वेळानंतर तिची आई गच्चीवरुन खाली आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आईने आरडाओरड केल्याने शेजारी नागरिक आले आणि त्यांनी कल्याणीला सर्वोपचार रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शोकाकुल वातावरणात कल्याणीवर अंत्यसंस्कार

कल्याणी ही परिवारासह सर्वांचीच आवडती होती. लेकीच्या मृत्यूने आई-वडिलांवर आभाळ कोसळलंय. अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत कल्याणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.