Nagbhid Accident News: दुचाकी अपघातात महिलेचा जागीच मृत्यू |
Nagbhid Accident News: नागभीड तालुक्यातील तळोधी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव पेट्रोल पंप जवळ दुचाकी अपघातात महिलेचा जागीच मृत्यू तर नातू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. Read Also: चिंचोली: वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
पुष्पा फुलचंद ठिकरे (७०) रा. सावरगाव असे मृतक महिलेचे नाव असून हि आपल्या मुलीच्या गावावरूण म्हणजे वैजापूर वरून आपल्या स्वगावी साक्षगंध कार्यक्रम साठी मुलीच्या मुलासोबत नातवासोबत आली व सायंकाळी ६ च्या सुमारास कार्यक्रम आटोपून आपल्या मुलीच्या गावी वापसी जात असताना वाटेतच काळाने झडप मारली व समोरासमोर दोन दुचाकीची जोरदार धडक झाली. Read Also: नागपूर हादरलं! नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महिलेचा नातू लोकेश अरुण बोरकर रा. वैजापूर ता. नागभीड हा जखमी झाला आहे.