'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur News: चेक बल्लारपूर गावालगत असलेल्या अंधारी नदी पात्रात आढळला इसमाचा मृतदेह - BatmiExpress.com

0

Marathi News, News,Latest News in Marathi,News,Chandrapur News,चेक बल्लारपूर गावालगत असलेल्या अंधारी नदी पात्रात आढळला इसमाचा मृतदेह
अंधारी नदी पात्रात आढळला इसमाचा मृतदेह

पोंभुर्णा
:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर गावालगत असलेल्या अंधारी नदी पात्रात दुपारच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळून आला. परशुराम लेनगुरे वय ६६ वर्षे रा. भेजगाव ता. मुल असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की सदर व्यक्ती दि. २३ सप्टेंबर ला १२ वाजताच्या सुमारास भेजगाव लगत असलेल्या उमा नदीपात्रात बैल धुण्याकरीता गेला असता पाण्याचा अंदाज न लागल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. हि बातमी गावातील नागरिकांना कळताच त्यांनी मुल पोलीस स्टेशन ला संपर्क केला असता मुल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीचा बोटीच्या सहाय्याने शोध घेतला असता. सदर व्यक्तीचा शोध लागला नाही. सदर व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
आज दि. २४ सप्टेंबर ला पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर गावालगत असलेल्या अंधारी नदी पात्रात दुपारच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना गावातील काही शेतकऱ्यांना दिसला असता. याची माहिती पोंभुर्णा पोलिस स्टेशनला देण्यात आली. 


पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. व सदर व्यक्तीची ओळख पटल्याने मुल पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुल पोलिस घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या व मृतकाच्या नातेवाईकांच्या मदतीने नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मुल पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथे पाठविण्यात आले.

पुढील तपास मुल पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपुत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोजदार यशवंत कोसनसिले सोबत पोलीस अंमलदार प्रविण झुरमुरे करीत आहेत.
मृतकाच्या पश्चात पत्नी, मुले, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×