![]() |
बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू |
बोरी अडगाव :- बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या बोरी अडगाव येथील २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील बोरी येथील माजी सरपंच निरंजन सुरवाडे यांचा मोठा मुलगा आशुतोष निरंजन सुरवाडे वय २२ हा सोमवारी पोळा सण असल्याने रविवारी सकाळी बैल धुण्यासाठी गावाशेजारील कारेगाव शिवारातील तलावामध्ये मित्रांसोबत गेला होता.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.