बापरे... बँकेच्या चुकीमुळे खात्यात 5.5 लाख खात्यात जमा झाले, तो व्यक्ती म्हणाला - मी ते आता का परत देऊ? पंतप्रधान मोदींनी मला पाठवले आहे - BatmiExpress.com

बापरे... बँकेच्या चुकीमुळे खात्यात 5.5 लाख खात्यात जमा झाले, तो व्यक्ती म्हणाला - मी ते आता का परत देऊ? पंतप्रधान मोदींनी मला पाठवले आहे - BatmiExpres

बापरे... बँकेच्या चुकीमुळे खात्यात 5.5 लाख खात्यात जमा झाले, तो व्यक्ती म्हणाला - मी ते आता का परत देऊ? पंतप्रधान मोदींनी मला पाठवले आहे - BatmiExpres
मी ते आता का परत देऊ? पंतप्रधान मोदींनी मला पाठवले आहे

बिहार 
मधील खगडीया जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हेर जाणून तुम्हालाही खरचं आश्चर्य वाटणारच. वास्तविक, ग्रामीण बँकेच्या चुकीमुळे येथील एका व्यक्तीच्या खात्यात 5.5 लाख रुपये आले आहेत. ज्या व्यक्तीच्या खात्यात हा पैसा आला आहे त्याने दावा केला आहे की त्याला हा पैसा पंतप्रधान मोदींनी 15 लाखांच्या आश्वासनाचा पहिला हप्ता म्हणून पाठवला आहे.

असे म्हणत त्याने बँकेला पैसे देण्यास नकार दिला आहे. त्याने आणखी बरेच निमित्त केले .या संपूर्ण प्रकरणात असे म्हटले जाते की, खगडीया मधील ग्रामीण बँकेने जिल्ह्यातील मानसी पोलीस स्टेशन परिसरातील बख्तियारपुर गावातील मूळ रंजीत दासच्या खात्यात चुकून 5.5 लाख रुपये पाठवले होते.

आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. या घटनेसंदर्भात मानसी स्टेशन प्रभारी दीपक कुमार यांनी सांगितले की, बँकेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून रणजित दासला अटक करण्यात आली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.