rape-on-minor-girl |
17 वर्ष 8 महिण्याच्या अल्पवयीन नराधम युवकाने सात वर्षाच्या बालीकेला घराजवळ खेळत असताना बिस्कीटचे आमीष देऊन घरी बोलावले. आणि सात वर्षीय मुलीवर त्याने पाशबी बलात्कार केल्याची घटना काल रविवारी घडली.
सविस्तर वृतांत: मात्र चोवीस तासानंतर सदर घटनेची वाच्च्यता झाल्याने आज पोलीसात तक्रार करण्यात आली तसेच पिडीतेची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली अशी माहिती प्राप्त झाली आहे.
पिडीत बालीका कुरखेडा तालुक्यातील नबरगाव येथील असल्याचे समजत आहे . पिडीत बालीकेला रात्री अचानक त्रास होत असल्याने कूटूंबियाना शंका निर्माण झाली. त्यांनी तिची विचारपूस केल्यावर सदर प्रकरणाचा उलगडा झाला व तिला आज उपचाराकरीता येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले .
पूढील तपासणी करीता तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्यरूग्णालयात हलविण्यात आले आहे अशी माहिती येथील रूग्णालयाच्या सुत्रांनी दिली आहे . आरोपी बिरोधात विविध कलमान्वये गुन्हा सूद्धा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आहे . या घटनेने परीसरात खळबळ माजलेली असून समाजमन सून्न झाले आहे व बिकृत मानसिकता असलेल्या अल्पवयीन आरोपी विरोधात परीसरात मोठा आक्रोश निर्माण झाला आहे .