'
30 seconds remaining
Skip Ad >

मुल तालुक्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू.... | बातमी एक्सप्रेस

0

वीज पडून दोन शेतकऱ्यांचा जागीच  मृत्यू,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur,News,Mul,Mul News,Two-farmers-killed-in-power-outage
मुल तालुक्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू.

मुल: चंद्रपूर
जिल्हयातील मूल तालुक्यात मौजा देवाळा येथे आज दि.1 जुलै रोजी गुरवारला अचानक अति तीव्र पाऊस आणि विजेच्या गर्जनेसह पावसाची जोरदार सुरवात झाली. 

पाउसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतातिल झाडांचा आसरा घेतला असता अचानक वीज कोसळल्याने (Two farmers killed) विलास केशव नागपूरे ( वय ५० ) वर्ष मौजा बोंडाला खुर्द व गयाबाई नामदेव पोरटे (वय ६० ) वर्ष मौजा बोंडाला खुर्द यांचा विज पडून जागीच मृत्यू झाला. (Two-farmers-killed-in-power-outage-in-mul)

ताराबाई नागापुरे व नामदेव तानू पोरटे हे गंभीर जखमी झाले. या सोबतच यात दोन बकऱ्याचा ही मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मूल तालुक्यात घडली आहे…

वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच बेंबाळ पोलिस ठाण्याचे चौकीदार, पोलिस उपनिरीक्षक, मूल येथील नायब तहसीलदार आणि बोडाळा खुर्दचे सरपंच यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेत गंभीर जखमी झालेले ताराबाई व नामदेव यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृतांवर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बोंडाळा खुर्द येथे हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×