![]() |
HSC Result Live Updates: एचएससी बोर्डाचा फॉर्म्युला जाहीर |
HSC Result Live Updates: एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 याच फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
दहावीचे 30% गुण, अकरावीचे 30% गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40% गुण या आधारावर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.
या मूल्यांकन पद्धतीला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता असल्याने एचएससी बोर्डाचा कायदेशीर मार्ग सुकर झाला आहे.
पदवी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या दोन बोर्डांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे त्यांची मूल्यांकन पद्धती एकसमान राखली आहे.
मूल्यमापनाचा तपशील:
- दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)
- 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)
- 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%)