Chandrapur News: पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण जनजागृती मोहिमेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी | बातमी एक्सप्रेस

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News: 
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणुन लसीकरणावर भर दिला जात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे कोविड-19 लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात 7 जुलै रोजी करण्यात आली असून आज (दि.10) सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवत शुभारंभ केला.

नागरिकांनी लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. या जनजागृती मोहिमेदरम्यान चित्ररथ, पोस्टर्स, स्टीकरशीट, जिंगल्स, हँडबील आदींच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सरपंच सुनिता उरकुडे, उपसरपंच भावना विखे, मनीषा जवादे, राकेश गड्डमवार, राजू सिद्धम, दिनेश चिटनूरवार, संदीप गड्डमवार प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.