Education News: शालेय शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेणारच
मात्र CET परीक्षा कोणत्या पद्धतीने घेण्यात येईल याची माहिती देण्यात आली नसल्याने याबाबत विद्यार्थी व पालकांत उत्सुकता होती.
अखरे शालेय शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेणारच असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले असून परीक्षेचे प्रारूप कसे असेल यासंदर्भातही अधिसूचना काढली आहे.
11वी प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा वैकल्पिक असून ती ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
CET परीक्षा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेत सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे.
ज्यात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, एसईआरसीटीईचे संचालक, बालभारतीचे संचालक, परीक्षा परीषदेचे आयुक्त, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक सदस्य सचिव आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.