गडचिरोली: जिल्ह्यामध्ये उद्यापासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण केंद्रावर कोरोना लस दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांसाठी १०० लस आणि ऑफलाईन नोंदणी करिता १०० लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व कोरोना लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २०० लसीकरण पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
जून २२, २०२१
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.