Chandrapur News: समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News: 
समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नागपूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्री, उपायुक्त तथा सदस्य विजय वाकुलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांकडून कार्यालय परिसरात नियमितपणे साफसफाई करून घ्यावी व परिसरात स्वच्छता राखावी. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून लाभार्यांना त्वरीत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशाही सुचना त्यांनी केल्या. जिल्हयात कोविड विषाणूच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या उपाययोजंनाची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली.
सामाजिक न्याय विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध योजनांची चित्रफीत सादर करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.