Chandrapur News: तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन | बातमी एक्सप्रेस

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur News IN Marathi,तेनझिंग नॉर्गे

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur News IN Marathi,तेनझिंग नॉर्गे

Chandrapur News: 
केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. 15 जून ते 5 जुलै 2021 या कालावधीत आवश्यक माहिती, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे इत्यादीसह नामांकन प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

नामांकने सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षातील म्हणजेच सन 2018, 2019 व 2020 मधील असणे आवश्यक आहे. तसेच साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असावे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे. तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2020 करीता नामांकने प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत.
तरी उपरोक्त आवश्यक माहितीसह तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2021 करीता जिल्ह्यातील खेळाडूंनी आपली नामांकने प्रस्ताव दिलेल्या विहित कालावधीत https://dbtyas-youth.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. तसेच आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे या कार्यालयाच्या [email protected] किंवा [email protected] या ई-मेलवर पाठविण्यात यावी. सदर प्रस्तावाची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.