'
30 seconds remaining
Skip Ad >

Yavatmal Corona Outbreak: यवतमाळ शहर व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद | Batmi Express Marathi

0

Yavatmal Corona News,Corona News in yavatmal,yavatmal hindi news,yavatmal latest news,yavatmal ki news,yavatmal korona news

Yavatmal Corona Outbreak: जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक यवतमाळ शहर व तालुक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याकरीता उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार यवतमाळ शहरातील व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
$ads={1}
यात प्रतिबंधित क्षेत्र मौजा खरद, शिवाजी नगर प्रभाग क्र.14, लोहारा येथे तीन ठिकाणी, जे.एन.पार्क, प्रभाग क्र.26 लोहारा, पोलिस मित्र कॉलोनी प्रभाग क्र.26, दत्तात्रय नगर प्रभा क्र.26 लोहारा, मीया नगरी, राधेनगरी प्रभाग क्र.26 लोहारा, जवाहर नगर प्रभाग क्र.14 लोहारा, जे.एन.पार्क प्रभाग क्र.13, वाघापूर ता. यवतमाळ तसेच देवी नगर, प्रभाग क्र. 26 येथे तीन ठिकाणे, मुंगसाजी नगर प्रभाग क्र.28, रेणूका नगर प्रभाग क्र.28, राजहंस सोसायटी प्रभाग क्र.28, रोहिणी सोसायटी प्रभाग क्र.28, महावीर नगर प्रभाग क्र.14, मौजा वरझरी येथे दोन ठिकाणी, मौजा सालोड, मौजा बोथबोडण या प्रस्तावित भागास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे. Read Also: शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी शेखर सिंह
वरील नमुद क्षेत्रात क्लस्टर कन्टेंटमेंट प्लॅन नुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेकरीता कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच मुख्याधिकारी नगर परिषद, यवतमाळ व ग्राम स्तरावर सचिव यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित करण्यात याव्यात आणि सदर्हु परवाना, पासेस धारकांची यादी संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी यांना तात्काळ द्यावी.
$ads={2}
परवाना, पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा पोलिस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतरचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी नगर परिषद, यवतमाळ व ग्राम स्तरावर सचिव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे मार्फत करावी. Read Also:  नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण
वरील आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी आदेशात म्हटले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×