
Gadchiroli Corona Updates: वीस मृत्यूसह आज जिल्हयात 370 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 108 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12952 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10854 वर पोहचली. तसेच सद्या 1911 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 157 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. Gadchiroli Corona Deaths Updates:
आज 20 नवीन मृत्यूमध्ये 64 वर्षीय महिला गोकूलनगर गडचिरोली, 65 वर्षीय पुरुष जि. चंद्रपूर, 65 वर्षीय पुरुष चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 78 वर्षीय महिला कलेक्टर कॉलनी गडचिरोली, 52 वर्षीय पुरुष आरमोरी जि.गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष विसोरा ता.वडसा जि.गडचिरोली, 40 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 27 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 57 वर्षीय महिला वडसा जि.गडचिरोली, 53 वर्षीय पुरुष विहिरगाव ता.वडसा जि.गडचिरोली, 55 वर्षीय महिला जि.यवतमाळ, 50 वर्षीय पुरुष जि.नागपूर, 55 वर्षीय महिला जि.गडचिरोली, 60 वर्षीय महिला जि.भंडारा, 57 वर्षीय पुरुष ऐकलापूर ता.वडसा जि.गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष कुरखेडा जि.गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 62 वर्षीय पुरुष नवेगाव कॉम्पलेक्स गडचिरोली असे महिला व पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.80 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.99 टक्के तर मृत्यू दर 1.21 टक्के झाला.
Gadchiroli Corona New Updates:
नवीन 370 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 150, अहेरी तालुक्यातील 23, आरमोरी 20, भामरागड तालुक्यातील 19, चामोर्शी तालुक्यातील 20, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 21, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 5, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 35 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 30 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 108 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 44, अहेरी 10, आरमोरी 2,मुलचेरा 1 ,भामरागड 20, चामोर्शी 8, धानोरा 1, एटापल्ली 0, सिरोंचा 3 ,कोरची 2 ,कुरखेडा 03 तसेच वडसा 14 येथील जणाचा समावेश आहे.